सुशांत प्रकरणी एनसीबीची मोठी कारवाई

Foto
शोविक चक्रवर्ती, सॅम्यूअल मिरांडाला घेतले ताब्यात
सकाळी साडेसहा वाजता दोघांच्या घराची घेतली झाडाझडती
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) आज सकापासून वेगवान कारवाई सुरु आहे. सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एनसीबीकडून सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. चार तासांच्या झाडाझडतीनंतर एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीने झाडझडतीच्या वेळी शौविकचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला असल्याचे वृत्त एका प्रसिद्धी माध्यमाने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीकडून सकाळी सॅम्यूअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली होती.
एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणार्‍या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बासीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. शोविक अमली पदार्थ विकणार्‍यांच्या संपर्कात होता, हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker